डेव्हिड बोगी
अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड बोगी वय 62 वर्ष यांचे काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
काल रात्री 8:30 च्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. थंडी वाजत होती. यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उपजिल्हा सामान्य रुग्णालय, अहेरी येथे दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर एक तासात त्यांचे निधन झाले. विविध कामानिमित्ताने काल अहेरी व आलापल्ली येथे फिरत होते. रात्री 8.30 दरम्यान ते घरी आले असता त्यांना अस्वस्थ वाटायला लागले होते.
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे ते खंदे समर्थक होते. प्रयोगशील शेतकरी म्हणून स्थानिक परिसरात त्यांची ओळख होती. राजकीयदृष्ट्या ते नेहमीच सक्रिय असायचे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व नातेवाईक असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

