भामरागड ता.१४- तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लीलाधर कसारे होते.प्रमुख अतिथी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सीतारामजी मडावी, लोककवी दादाराव कुसराम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम झोडे, सेवानिवृत्त प्राध्यापक युवराज निमगडे, महसूल विभागाचे कोल्हे, जेष्ठ नागरिक आत्माराम वैद्य, वनविभागाचे रंगारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांना मालार्पन करुन वंदन करण्यात आले.त्यानंतर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन त्रीशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले.उपस्थीत मान्यवरांनी व रौनक ओंडरे या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांवर मार्गदर्शन केले. सायंकाळी ६.१५ वाजता भामरागडचे मुख्य मार्गावरुन भिमज्योत रॅली काढण्यात आली.स्थानिक बौद्ध विहार येथून निघालेल्या रॅलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घोषणा देण्यात आल्या.७.३० वाजता बौद्ध विहारात रॅलीची सांगता करुन भोजनदान देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर मुरमाडे यांनी केले.संचालन तारका टेंभुर्णे हिने केले तर उपस्थितांचे आभार ओंडरे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नगराळेताई,मुरमाडेताई, तेजस्विनी ढवळे,अनुप मोडक इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला बहुसंख्य स्री-पुरुष उपस्थित होते.

