लाकूड तस्करी प्रकरण
एटापल्ली : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या जीजावंडी येथे पकडण्यात आलेल्या सेमल लाकूड प्रकरणातील आरोपी मिहीर निमाई दत्ता याला आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहेरी येथे उपस्थित केल्या जाणार आहे.
आठवड्यापूर्वी जीजावंडी येथे सेमल लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडण्यात आला होता. वनविभागाच्या मते पकडण्यात आलेला ट्रक पळविण्यात आला.वनविभागाने छत्तीसगडच्या पाखंजूर येथे जाऊन ट्रक जप्त केला.
जप्तीच्या वेळेस वन विभागाला आरोपी सापडले नाही. काल मिहीर निमाई दत्ता नामक एका आरोपीला अटक करण्यात आली. अजून तीन आरोपी फरार आहेत.
मिहीर निमाई दत्ता याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने वन कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. या मागणीसाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मिहीर दत्ता याला आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहेरी येथे उपस्थित करणार आहेत.

