प्रतिनिधी
अहेरी : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथे आज पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एम्प्लॉईज फॉर पीपल्स अंड स्टुडन्ट अहेरीकडून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण पालक मेळाव्यात करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस होत्या.प्रमुख पाहुणे उच्च माध्यमिक शिक्षक किशोर बुरबुरे होते. रमेश दुर्गे, निवृत्ती दुर्गे, शिक्षक वटी, गुरनुले, आईंचवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम आलेली अक्षदा रामदास झाडे व द्वितीय आलेली काजल बडोदया यांच्यासहित 28 प्रोत्साहनपर पुरस्कार विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले.
वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आटोपली आहे. एक-एक वर्ग त्या पुढे जाणार आहेत. कुठे शिकायचे, काय शिकायचे यावर विद्यार्थिनींनी पालकांशी विचारविमर्श करून निर्णय घ्यावा. उच्च शिक्षणासाठी शहर जवळ करावे असे मार्गदर्शन केले.
यावेळेस पालकांची व विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

