अहेरी : सकाळ पासूनच पतसंस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षक मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. उन्हाचा तडाखा सुरू असला तरी पतसंस्थेचे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. प्रत्येकाने उत्साहात मतदान केल्याचे चित्र दिसते.
मतदारांसोबत सकाळी सातच्या दरम्यान उमेदवार सुद्धा घराबाहेर पडले. मतदारांच्या निवाऱ्याच्या दृष्टीने मंडपाची व्यवस्था केली. नाश्ता, चहा, पाण्याची सोय केली. सकाळी सगळ्याच उमेदवारांचे चेहरे प्रफुल्लीत होते. एक वाजला. उमेदवारांच्या चेहऱ्यावर गंभीरता निर्माण झाली. उमेदवारांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत आहे.
धकधक करने लगा….
मोरा जीरा डरने लगा….
अशी अवस्था उमेदवारांची दिसत आहे.
पतसंस्थेमध्ये एकूण 418 मतदार आहेत. पैकी 60 ते 70 मतदार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये विखुरले आहेत. 340 पर्यंत मतदार अहेरी आलापल्ली, एटापल्ली,भामरागड या ठिकाणी आहेत. एटापल्ली केंद्रावर तालुक्यातील मतदार मतदान करणार आहेत. भामरागडचे मतदार अहेरी येथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावित आहेत. अन्य पंचायत समितीमध्ये असलेले मतदार काही प्रमाणात मतदानासाठी आल्याचे दिसले.
मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मतदानाची वेळ सायंकाळी चार पर्यंत आहे. 70 ते 80 टक्के पर्यंत मतदान जाण्याची शक्यता आहे. वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वाढलेले मतदान कुणाकडेही जाऊ शकते. यामुळे ‘धकधक करने लगा’ अशी अवस्था उमेदवारांची झाली आहे. समर्थक आणि उमेदवार आपापल्या पॅनल बद्दल दावा करताना दिसतात.

